Stories Of My Life #004

गोष्ट अक्कांच्या लग्नाची - माझ्या मनातली 

पौड़ रोडच्या PNG मध्ये तुझ्या दागिन्यांची खरेदी सुरु होती. आत्या, आजी, काकू, मामी आणि काही पुरुष मंडळी आणि तुझ्या सासरकडचे असा बराच मोठा ग्रुप होता. दुकानाचा वरचा मजला आपल्याच लोकांनी भरला होता. थोड्या थोडक्या लोकांमध्ये मुळी कुठे होतंच काय आपलं. मला आठवतंय माझ्या लग्नाच्या खरेदीची पण अशीच गडबड होती.

गेले कित्येक दिवस आम्ही प्रत्येक सराफाच्या दुकानात जाऊन त्यांच्याकडे लेटेस्ट दागिने बघून येतोय. या सगळ्या market research मधून २ दुकानं shortlist केली आणि त्यातलं हे शेवटचं दुकान आणि आज major खरेदीचा, तसा शेवटचा दिवस.

लग्न म्हणलं कि खरेदीला काही कमी नाही. कपडे, चपला, दागिने, बांगड्या, शेला, लग्नातले कपडे, लग्नानंतरचे सासरी जाण्याचे कपडे, नंतर honeymoon ची खरेदी. आणि त्यावर किरकोळ काहीबाही अशी खरेदी कित्येक दिवस चालू आहे, आणि of course खरेदीच्या निमित्ताने कधी सुजाता मस्तानी, कधी relax पाव भाजी, कधी दुर्गा ची cold coffee, धावणगिरी डोसा अशा ठरलेल्या ठिकाणी न चुकता visit देतोच आहोत.

पुण्यात आल्यापासून या सगळ्या नवीन जागा सापडल्या आहेत. पूर्वी मी माळेगाव ला college ला असताना आमचे typical खाऊ गल्ली points होते - अमृता, नौशाद, घराजवळचं सावरिया ice cream! मला चांगलं आठवतंय गच्ची वर साजरी केलेली कोजागिरी!

माळेगावच्या घरच्या गच्ची वरून sunset खूप छान दिसतो. मी आणि माझ्यामुळे अक्का बऱ्याच वेळा गच्चीवरून sunset बघत बसायचो. आम्ही कधी फार बोलायचो नाही. अजूनही तास फारसं बोलत नाहीच. दोघी अबोल आणि त्यातून आमचं नातं इतकं close knit कि त्यात फार शब्दांची गरज आणि शब्दांना जागा दोन्ही नाही. त्यामुळे बरेच संवाद न बोलताच साध्य! अशा सगळ्या छोट्या क्षणातला आनंद लुटताना आमचं हे नातं अजूनच घट्ट झालंय.

मी बऱ्याच वेळा तिच्या मैत्रिणीच्या तर क्वचित ताईच्या भूमिकेतून ताईगिरीचे dose मात्र देत असते. 7 habits of highly effective people च्या नावाखाली मी तिला पूर्वी सुद्धा असे कित्येक उपदेश दिलेत. त्यातूनच माझं nickname आधी HT (highly effective ताई) आणि नंतर TT (तेजस ताई) पडलंय!

अशाच एका उपदेशाच्या क्षणी मी तीला सुनेच्या रोल चा उपदेश दिला पर्वाच. एका मुलीतून एका सूनेमध्ये होणारं transition हे फक्त आणि फक्त त्या मुलीलाच कळतं.

आई वडिलांच्या पोटातून सासू सासऱ्यांच्या हृदयांत प्रवेश होत असतो. ज्या पोटात आपण सगळं सामावून घेतो, तेच पोट आपल्याला जन्म देतं, आणि तेच पोट हृदयही देतं. अशा विशाल पोटात आपण इतकी वर्षं खेळत बागडत असतो. आपल्या सगळ्या चांगल्या वाईट सवई, सगळ्या गोष्टी ते पोट सामावून घेतं. पण आता ह्रदयात प्रवेश करताना मात्र थोडी काळजी घ्यावी लागते. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांच्या तालाबरोबर तुझा ताल जुळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. तुझ्या कोणत्या वागण्याने ते हृदय दुखावणार नाही ना याची खास काळजी घ्यावी लागते. एकदा का हा ताल साधलास की झालं! मग निर्माण होतं सुमधुर संगीत - पोटातून हृदयापर्यंत जाणारं!
हा ताल सांभाळण्यासाठी कधी मनाला मुराद घालावी लागेल, कधी दोन गोष्टी out of the way जाऊन कराव्या लागतील. तुझ्या, माझ्या आईने, सासूने, सगळ्यांनी हेच केलं. In fact मुलीतून सून झालेल्या प्रत्येक मुलीने हेच तर केलं! म्हणूनच तर आजवर इतके संसार झालेत. आणि हो हे सगळं जसं तुला करावं लागतं तसंच अमोघ ला सुद्धा करावं लागतं.

या सगळ्यावर तू मिस्किलपणे म्हणालीस - हो तर! भारतीय नारीचा role आहेच खूप महत्वाचा! उगीच नाही आपण लोकसंख्येने एवढे आघाडीवर! मी मोठ्याने हसले आणि तेवढ्यात cabin crew ची announcement झाली - We are shortly landing in Mumbai. Flight मधले दिवे लागले आणि माझ्या विचारांच्या गाडीला break लागला.

स्वप्नांतून मी वास्तवात आले. तुझं लग्न २ आठवड्यांवर आलं होतं आणि मी just Mumbai ला पोहोचत होते.. तुझ्या लग्नाच्या तयारीच्या त्या सगळ्या अनमोल क्षणांना मी मुकले होते आणि तू मुकली होतीस माझ्या सहवासाला! सुनेच्या भूमिकेचा तुला करायचा तो उपदेशही राहूनच गेला होता. पण खरं सांगू, तुला मुळी त्या उपदेशाची गरजच नाही. आजवर जसं सगळं न सांगता कळत आलंय तसंच हेही समजेलंच!
ही होती गोष्ट तुझ्या लग्नाची - माझ्या मनातली.

तुझी TT

10 Nov 2017

Comments

Post a Comment

Popular Posts