Stories of my Life #003

घर ते विमानतळ - अध्याय पहिला

दोन मोठ्या २३ किलोच्या bags, एक handbag, एक मोठी purse, अंगावर जाड jeans, t-shirt, jacket आणि पायात सगळ्यात जड shoes घातलेली मी मुंबई अंतर्राष्ट्रीय विमानतळाच्या डिपार्चर टर्मिनल वर उभी होते! रडून अणि जागून सुजलेले डोळे, dehydration ने कोरडा पडलेला घसा, एवढे जाड कपडे घातल्याने घामेजलेला चेहरा, एकंदरीतच सगळ्या तणावामुळे प्रचंड थकलेलं मन अणि शरीर..... कोणत्याही क्षणी झोपेन एवढी मी दमले होते.

गेले दोन महीने कसे गेले कळलंच नाही. माझं २१ January २००७ चं Air India च्या फ्लाइट चं टिकिट काढलं होतं. अणि तेव्हापासून घरातल्या सगळ्यांची सतत धावपळ सुरु होती.

मी परदेशी जाणार हे कळल्यापासून, इतक्या उत्तमोत्तम सूचना मिळत होत्या की  विचरता सोय नाही - कमीतकमी वजानाच्या bags घे, सगळ्यात जड अणि जाड कपडे घालून जा, airlines च्या allowance चा maximum उपयोग करून शिवाय ३/४ किलो वजन तरी जास्त नेच असे कित्येक उपदेश. एक सल्ला तर असाही होता की जमल्यास एकावर एक २/३ कपडे घालून जा!! म्हणजे आता जेवढा श्वास घेवू शकत होते तेवढाही बंद होऊन माझं विमान केव्हाच वर उडालं असतं!!    

किमान वरण, भात, पोळी, भाजी, चहा, पोहे, शिरा करायला काय काय भांडी लागतात त्यावर घरात सतत चर्चा सुरुच होती. तिकडे गेल्यावर साधारण २ आठवडे तरी पुरेल एवढा शिधा अणि खाऊ बरोबर देण्याचं ठरलं होतं. तिकडच्या (अती भीषण) थंडीसाठी thermals (जे मला अजून पर्यंत कधीही घालावे लागले नाहीत!) अणि jackets घेतले होते. तिकडे सतत pant shirt घालायला लागणार म्हणून त्यातल्या त्यात modern पण घट्ट किंवा खोल गळा नसलेले tops (of course आई च्या पसंतीने) घेण्यात आले होते. थोडक्यात, मी London, England ला जाण्याची जोरदार तयारी सुरु होती.

Check -in counter वर माझं नाव paint केलेली bag जेव्हा मी त्या weighing scale वर ठेवली तेव्हा त्या मुलाने माझयाकडे ज्या काही sympathy ने पहिलं की मला परत वर बघायला ही जमलं नाही. अरेअरेअरे काय उपद्व्याप केले होते त्या bag चे... काळ्या bags वर flourescent white रंगाने माझं नाव paint केलं होतं! आणि ते कदाचित पुरेसं वाटलं नासवं म्हणून वरुन एक दोन star marks पण काढले होते...
इतर कोणी सोडाच मला सुद्धा माझया bags ना हात लावावासा वाटत नव्हता अशी अवस्था होती!!     

त्या bags कडे बघून माझी आणि बाबांची दमछाक आठवली..... समोरच्या किराणा दुकानातल्या मोठ्या काट्यावर वजन करण्यासाठी मी आणि बाबांनी त्या २३ किलो च्या २ bags घरच्या अरुंद जीन्याने खाली नेवून - रस्ता ओलांडून - त्या काट्यावर वजन करुन - पुन्हा त्या अरुंद जीन्याने वर आणल्या अणि तेहि - तीनदा!! प्रत्येक वेळी वजन जास्त झालं म्हणून, एक दोन वस्तु कमी करुन 'आता असू दे तेवढं - झालं असेल २३ किलो' या अपेक्षेने!

सगळ्यांच्या सल्ल्यानुसार bag मधे माझं नाव, बाबांचा फोन नंबर, london च्या मित्रांचा पत्ता व फोन नंबर लिहिलेले कागद टाकले होते. घरातून निघताना आईने आणि बाबांनी मला चार चार वेळा टिकिट, boarding pass आणि passport सगळं ठेवलं आहे ना हे बघायला लावलं होतं. दोन गाड्या घेवून आई, बाबा, काका, दादा, आत्या, तिचे यजमान, मावशी, तिचे यजमान, cousins आणि काही friendsअसे सगळे आम्ही airport ला निघालो. आदल्या दिवशी रात्री पुण्यात काकांकडे थांबून दुसऱ्या दिवशी मुंबई असा बेत होता.

इंदापुरहून निघालो, आजीला नमस्कार करायला मी खाली वाकले आणि डोळ्यांना घळघळा धारा लागल्या. सगळ्यांच्याच! इतके दिवस मनात असलेल्या आनंदाला आणि काळजिला अश्रूंनी वाट दिली. त्या रात्री पुण्यात आई शेजारी झोपलेले तेव्हा तिचा घट्ट धरलेला हात मला आठवत होता. 'का दूर जाते अहेस तू?' आणि 'का दूर जाते आहे मी?' हा तिला आणि मला तेव्हा पडलेला प्रश्न आजही मनात घर करून आहे.

Bus मधे कधी माझया चेहऱ्यावर ऊन येत असताना दोन sliding खिडक्यांच्या मधे newspaper अडकवून ऊन्हाला block करणारे, trip हुन रात्री उशिरा घरी येताना शाळेपाशी तासभर माझी वाट पाहणारे, मला केवळ ४ लाड़ू जास्त नेता यावेत म्हणून ती २५ किलो ची bag चार वेळा जीन्याने वर खाली करणारे, माझा सगळ्यात मोठा support असणारे माझे बाबा इथून पुढे सतत माझया बरोबर नसणार या कल्पनेने पोटात खड्डाच पडला.

परदेशी शिक्षणाचे काहीही plans नसलेली, भारतामध्ये career घडवायची स्वप्न पाहणारी, एका अत्यंत साधारण, मध्यमवर्गीय परिवरतली मुलगी- मी - आज मात्र Kingston University मधे शिकण्यासाठी या अंतर्राष्ट्रीय विमानतळाच्या departure terminal ला बसले होते. मनात कित्येक प्रश्न घेवून...प्रश्नं ज्यांची उत्तरं मी आजही शोधते आहे..... 

कशासाठी मनावर दगड ठेवून एवढे कठोर निर्णय घ्यायचे?

का जाणून बुजून स्वतःला अणि आई बाबाना या यातना भोगायला लवायच्या?

- तेजस कुलकर्णी
१० Aug २०१७ 


Comments

  1. Simply Great!! Sagal jaschya tas dolyasamorun gel...

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts