Stories Of My Life #001

जळत्या लाकडाचा वास

जळत्या लाकडाचा वास आला कि मला आठवते ती दिवाळीची पाहट. आई बाबा आणि मी दर वर्षी मुंबई हुन इंदापूर ला जायचो दिवाळीला. इंदापूर, माझ्या बाबांच गांव. तिथे आमचा वाडा होता, दोन हात रुंद अशा भिंतींचा!

इंदापूरला आजी, आजोबा, आत्या, काका आणि दादा (धाकटा काका) राहायचे. दर वर्षी दिवाळी ची सुट्टी लागली कि आम्ही इंदापूरला यायचो. कधी कधी मुंबई हुन थेट इंदापूर तर कधी मुंबई हुन पुणे आणि मग पुण्याहून पुढे इंदापूर.

ए .स .टी बसचा तो प्रवास आठवला कि आजही मला धडकी भरते. गर्दीने खचाखच भरलेल्या बसेस आणि ए .स .टी  स्टॅण्डस! गर्दीचा अंदाज घेऊन आई बाबांनी हमखास रिझर्वेशन केलेलं असायचं, पण तरीदेखील ती गर्दी पहिली कि माझा जो काही भोंगा सुरु व्हायचा, कि विचारायला नको. आई बिचारी एका हातात मला कडेवर घेऊन, दुसऱ्या हाताने सुटकेस आणि पर्स सांभाळत कशी तरी त्या गर्दीत तग धरून उभी असायची. बाबा इतर सामान घेऊन पुढे जाऊन बस मध्ये चढायचे. मग बाहेरची सगळी गर्दी बस मध्ये कोंबली गेली कि आई मला घेऊन चढायची.

आत चढल्यावर आमच्या रिझर्वड सीट पर्यंत पोहोचणे म्हणजे बाहेरून आत येण्यापेक्षाही अधिक धैर्याचं काम असायचं. माझी रवानगी आता आई कडून बाबांच्या कडेवर झालेली असायची. हिरव्या सीट कव्हर्स, लोखंडी खांब, सारिका - प्रशांत (मध्ये बदाम आणि त्यात बाण) इत्यादी कोरीव लेखन असलेली ती ए .स .टी बस! आडवे, तिरके होत, लोकांच्या निरनिराळ्या आकाराच्या सामानावरून उंच उडी, लांब उडी मारत आम्ही कसेतरी आमच्या सीट पर्यंत पोहोचायचो. हे सगळं सुरु असताना माझा 'नको ना गर्दीत जायला' चा अखंड सपाटा लागलेला असायचा.

सगळं सामान सीटच्या खाली किंवा कॅरियर वर ठेवून आई बाबा सुटकेचा श्वास घ्यायचे आणि माझा आक्रोश हुंदके देत हळू हळू मावळायचा. अशा प्रकारे एकदा का आमचा प्रवास सुरु झाला कि सुरु व्हायची माझी वमन गाथा! आई ने प्लॅस्टिकच्या पिशव्या हाताशी ठेवलेल्याच असायच्या. घाटामध्ये कधी ओकत तर इतर वेळी झोपत असा माझा मुंबई ते इंदापूर चा प्रवास कसाबसा पूर्ण व्हायचा.

ए .स .टी स्टॅण्ड पासून आमच्या वाड्यापर्यंत पोहोचायला साधारण १५ मिनिटं लागायचे. आम्ही बऱ्याचदा पाहाटे ३/३.३० ला इंदापूर ला पोहोचायचो आणि रिक्षेअभावी अगदी प्रत्येकच वेळेला आम्ही पायीच निघायचो. स्टॅण्ड पासून तो घरापर्यंतचा पायी केलेला हा परावास माझ्या आठवणीत कायमचा घर करून राहिला आहे. बाजारपेठेतल्या त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूना घरं होती. पहाटेच्या वेळी घरातल्या मुली, स्त्रिया आपापल्या घरांसमोर सडा टाकत किंवा रांगोळी काढत असायच्या. कोणीतरी दारासमोर पणती लावत असायचं. प्रत्येक घरामध्ये पाण्याचा बंब सुरु झालेला असायचा आणि त्यात जळणाऱ्या सर्पणाचा गंध साऱ्या आसमंतात भरून राहायचा. पणतीच्या मंद प्रकाशात, सुंदर रांगोळ्यांनी सजलेलं ते गांव, जळत्या लाकडाच्या खरपूस गंधात न्हाऊन निघायचं.  इथेच सुरु व्हायची दिवाळी, माझ्या मनातली.

घरी पोहोचल्यावर आजी दारातच आधी भाकरीचा तुकडा आणि मीठ मुठीत धरून दुष्ट काढायची, पायावर पाणी घालायची. ओट्यावर आजोबांनी बंब नुकताच सुरु केलेला असायचा. आणि तोच खरपूस असा जळत्या लाकडाचा वास हवेत पुन्हा भरून जायचा. सगळे हसरे चेहरे एकमेकांना भेटून तृप्त व्हायचे. आत्या, काका, दादा साठी आणलेल्या वस्तू आई बाबा कौतुकाने बॅगेतून काढायचे.

झोप कुठेच पळून गेलेली असायची. अभ्यंग स्नान आणि फराळाची तयारी सुरु व्हायची. काका, दादा मला फटाके उडवायला घेऊन जायचे आणि दिवाळी खऱ्या अर्थाने सुरु व्हायची :)




आजही रस्त्याने जाताना कधी जळत्या लाकडाचा वास आला कि मी क्षणभर थांबते. आठवणींच्या या झऱ्यामध्ये चिंब भिजून निघते. त्या दिवसाची माझी संध्याकाळ हि दिवाळीमय झालेली असते.

- तेजस कुलकर्णी
   ०१ जानेवारी २०१७


ता. क :

वाचकांना उत्सुकता असल्यास माझ्या लेखात वर्णन केलेल्या बंबाच एक चित्र इंटरनेट वर सापडेल. आणि दिवाळी चा उल्लेख आल्याने दुसरे चित्र गेल्या वर्षीच्या दिवाळी च्या रांगोळीचं टाकलं आहे.

दिवाळी शी निगडित तुमच्याहि काही आठवणी असतील ना, ठेवणीतल्या! खाली कॉमेंट्स मध्ये लिहा, मला वाचायला नक्की आवडेल :)

लेखनाचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा सांभाळून घेणे! तुमच्या प्रतिक्रियेसाठी मी अत्यंत उत्सुक आहे!

  

Comments

  1. Replies
    1. Thanks a lot Parth!! I'm pleasantly surprised to see you read Marathi:)

      Delete
  2. Khup chan Tejas! I still remember the 'Fulranni' played by you.... Suparb writing... Keep it up.. looking forward for more...

    Vijay mardane

    ReplyDelete
    Replies
    1. Thank u Vijay dada!! Wow Fulrani lakshat ahe ajun! The good old days 😊

      Delete
  3. Tejas tai, mazi sutti mhanaje pan destination Indapur.. I still miss our sindrella act play in childhood, I always wanted to be sindrella's ( yours) son but Pilu mala kadhich houn nahi dyayach... mag mi Prachi Tai's son.. istri cha issue varachya gharachya madivaracha pan athavato...

    To state the obvious, I miss those days tai... But you made me refresh those memories...

    Well wrote tai...

    ReplyDelete
    Replies
    1. OMG Shekhar!!! Tula athavatayt te khel apan khelaycho!! Hahahah, kasli majja yeychi! Ho ani istricha zalela dhoor! Bapre!! We were crazy back then and I'm glad we still are in some ways :) Apan saglyani ekatra Indapur la bhetayla pahije!!

      Delete
    2. Yes... We all should have a get together....

      Delete
  4. जळत्या लाकडाच्या वासाचं वर्णन कोणी इतकं झकास करू शकतं मला खरोखर माहीत नव्हतं.
    नाहीतर, कोणीतरी आपल्या प्रगतीवर जळतंय म्हणताना, बघा बघा कसं जळतंय लाकूडssss! म्हणण्याची प्रथा माहीत होती...
    Jokes apart, खरंच खूप सुंदर वर्णन केलंय तू तेजू त्या सगळ्या दिवाळी पहाटच्या 'माहौल'चं...
    आम्ही मनाने कधीच तुझ्याबरोबर इंदापूरला पोहोचलो..
    Keep writing dear...
    तुला असं भरभरून सुंदर लिहीण्यासाठीच्या अनेक अनेक शुभेच्छा !!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Pallu maushi!! Tu ashich vachun pratikriya det raha :) :)

      Delete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts